Latest NewsNanded
नांदेड : डोंगरगावात विजेच्या झटक्याने गोठा जळून खाक; ६ जनावरे मृत

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे रात्री झालेल्या पावसादरम्यान विजेचा मोठा आघात झाला. या घटनेत शेतकरी किशनराव व्यवहारे यांच्या गोठ्याला आग लागून चार दुभत्या गाई व दोन वासरांचा मृत्यू झाला.
आगीत गोठ्यासह ठिबक सिंचन यंत्रणा, फवारणीचे साहित्य, जनावरांचा चारा आणि इतर महत्त्वाचे साहित्यही जळून गेले. या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व काही भस्मसात झाले होते. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.



