Crime NewsLatest News

बिहार हादरलं! मुलासाठीच्या लोभामुळे बापानेच मुलीची निर्दयी हत्या केली

बिहारच्या जमुई जिल्ह्यातील सिकंदरा नगर परिसरातील पुराणी चौक भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगा न झाल्याने एका व्यक्तीने स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा गळा दाबून जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलीचं नाव अनुराधा उर्फ लाडो असून ती निष्पाप वयातच आई-वडिलांच्या वादाचा बळी ठरली.

घटनेबाबत मुलीची आई पूनम कुमारी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी घरकाम करत असताना त्यांचे पती मन्नू चौधरी यांनी त्यांना बाजूला सारून मुलीला उचलले आणि तिचा गळा दाबला. त्यावेळी पूनम कुमारी यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, ज्यामुळे परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. माहिती मिळताच पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. समाजात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा यांसारख्या उपक्रमांवर भर दिला जात असताना, अजूनही मुलगा हवासा वाटून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असल्याने जनमानसात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button