Crime NewsLatest News

अमरावती ग्रामीण भागात पुन्हा जुगाराचे अड्डे जोरात वाढले

अमरावती ग्रामीण भागातील सिटी न्यूज वर खुलेआम सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर बातमी प्रसारित झाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने असदपूर येथे कारवाई करून जुगाराचा अड्डा बंद केला होता. मात्र, या कारवाईनंतर काही दिवस शांतता असली तरी आता पुन्हा वरली मटका आणि जुगाराचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याचे समोर येत आहे.

दर्यापूर सर्कल, चंडिकापूर आणि खारतळेगाव या ठिकाणी हा बेकायदेशीर धंदा पुन्हा सुरू झाला असून, पथ्रोट येथे तर सर्वात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ‘दुबेजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे हा अड्डा असल्याचे सांगितले जाते. त्यांचे वरली किंग तिकडी सोबत थेट संबंध असल्याचेही वृत्त आहे. पथ्रोट परिसरातील हॉटेल्स आणि झोपडपट्टी भागांत रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, इथे केवळ अमरावतीच नाही तर अचलपूर, मेळघाट आणि मध्यप्रदेशातीलही लोक मोठ्या प्रमाणावर जुगार खेळण्यासाठी येतात.

दरम्यान, चंडिकापूर आणि खारतळेगाव येथे आधी झालेल्या पोलिस कारवाईनंतर जुगार बंद झाला नाही, तर केवळ त्याची पद्धत बदलली आहे. आता चिठ्ठ्यांच्या माध्यमातून हा धंदा सुरू असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. दर्यापूर शहरातही तिकडम लावून वरली मटका सुरू असल्याचे दिसून येत आहे.

वसीम, घाणीवाले आणि चोरपगार यांचा या जुगाराच्या धंद्यावर दबदबा असून, त्यांच्या हौसले बुलंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ग्रामीण पोलीस या साखळीवर कितपत प्रभावी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button