Accident NewsLatest News

सायकलवरून जात असताना ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; तरुणीचा मृत्यू

वाशीम : शहरात दुपारच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. क्लासला जाण्यासाठी घरून निघालेली संध्या सारसकर (वय १६), दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी, सायकलवरून रस्ता ओलांडत असताना ट्रॅव्हल्सच्या धडकेत ठार झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मीबाई शाळेत शिक्षण घेणारी संध्या दुपारी क्लाससाठी घराबाहेर पडली होती. रस्ता मोकळा दिसल्याने तिने सायकलवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण याच वेळी पुसदच्या दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने तिच्या सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत संध्या दूरवर फेकली गेली आणि जागीच ठार झाली.

या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, ते पाहून नागरिक हादरले आहेत. शहरात एकच खळबळ उडाली असून, वेगवान व निष्काळजी वाहनचालकांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button