लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये; शिंदेंचं आश्वासन

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्लॅक अँड व्हाईट या विशेष कार्यक्रमाला भेट देत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले.
महालुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू करत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपल्या घोषणापत्रात या योजनेचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.
कार्यक्रमादरम्यान याच संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही महिलांना दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण करू. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयांवर नेण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाईल.”
या वक्तव्यानंतर राज्यातील महिलांमध्ये नव्या हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ही योजना अधिक परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



