Latest News

एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड, पायलटने दिला तातडीचा इशारा

दिल्लीहून इंदौरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 1028 विमानात हवेत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी (५ सप्टेंबर) घडली. या विमानात एकूण १६१ प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते.

इंजिनमध्ये समस्या जाणवल्यानंतर पायलटने तत्काळ “पॅन-पॅन कॉल” देत परिस्थितीची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) दिली. पायलटच्या सतर्कतेमुळे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मदतीमुळे विमानाला कोणताही अपघात न होता ते सुरक्षितपणे इंदौरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सकाळी ९.५५ वाजता उतरवण्यात आले.

विमानतळ संचालक विपिनकांत सेठ यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असून कोणतीही हानी झाली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button