Latest News

उद्या गाड्या टाळा, सार्वजनिक वाहतूक वापरा – मुंबईकरांना आवाहन

मुंबईत यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असून, उद्या शनिवार (६ सप्टेंबर) रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरभर विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. विशेषत: गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा आणि इतर प्रमुख मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत. भायखळा, नागपाडा, काळबादेवी आणि डी. बी. मार्ग विभागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले असून, काही रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी निवडक भागांमध्ये पार्किंगवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विसर्जनाच्या दिवशी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि सर्वांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. यामुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पडेल आणि नागरिकांचा त्रास कमी होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button