Crime NewsLatest News

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास खुनाची ही संतापजनक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. पतीच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला जिवानिशी ठार करण्यात आलं. अरविंद नजीर सुरत्ने असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी 3 सप्टेंबरला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने देखील पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. पती पत्नीत आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरवरून वाद सुरू झाला होता. मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच अटक केली. तर, महिलेला बुधवारी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मृताचा मोठा भाऊ अशोक यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मारेकरी अमित लवकुश मिश्रा (33, रा. पथ्रोट) याच्यासह 38 वर्षीय महिलेला अटक करून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. दोघांनाही एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यवसायाने चालक असलेल्या अरविंदचा प्रेमविवाह झाला होता. तो पत्नी व दोन मुलांसमवेत झेंडा चौक परिसरात भाड्याने राहत होता. 2 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 च्या सुमारास फिर्यादी अशोक हे परतवाडा येथे असताना त्यांना भाचा अनिलने फोन केला. अरविंद मामा व मामी यांच्यात अमित मिश्रा याच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे कडाक्याचा वाद झाला आणि यातूनच खून झाल्याचे अनिलने फोनवरून सांगितले. त्या दोघांनीच अरविंदला मारून टाकल्याचे अशोक सुरत्ने यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. लाकडी राफ्टरने अरविंदच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

अरविंद यांना 7 व 5 वर्षांची दोन मुले आहेत. त्यांना आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपूर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर संपले होते. त्यावेळी पत्नीच्या प्रियकराने म्हणजेत आरोपी अमितने ते भरून आणले होते. ती गोष्टी अरविंद यांना समजल्यानंतर त्यांनी पत्नीला याबाबत जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. २ सप्टेंबरला रात्री अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी प्रियकर अरविंदच्या घरी पोहोचला. दोघांनी मिळून अरविंदचा खून केला. अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button