AmravatiLatest NewsMaharashtra

लग्नानंतर काही महिन्यांतच विवाहितेची आत्महत्या; जुना धामणगाव येथे खळबळ

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेख आयशा शेख मजहर असे या विवाहितेचे नाव असून, अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशाने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना लक्षात येताच तात्काळ दत्तापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

एका तरुण विवाहितेने इतका टोकाचा निर्णय का घेतला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे आयशाच्या कुटुंबावर आणि नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आत्महत्येचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button