अमरावतीत ‘इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चर इंजिनियर्स’चा स्तुत्य उपक्रम – उत्तम दर्जाच्या बांधकामासाठी पारितोषिक स्पर्धा

अमरावती : शहरात दर्जेदार आणि नियमबद्ध बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चर इंजिनियर्स – अमरावती शाखेच्या वतीने एक विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि गुणवत्ता या निकषांवर अधिक भर देणे.
या स्पर्धेअंतर्गत अशा बांधकाम प्रकल्पांची निवड केली जाणार आहे, जिथे शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले असून, उच्च दर्जाचे मटेरियल वापरून उत्कृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. या कामगिरीसाठी संबंधित अभियंते, उद्योजक आणि स्वतःचे घर बांधणारे नागरिक यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
२० सप्टेंबर २०२५ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात वैयक्तिक, सामूहिक आणि व्यावसायिक गटांमध्ये पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून सर्व स्तरांवर बांधकामातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन मिळेल.
मिलिंद कारडे आणि मोहोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाच्या माध्यमातून अमरावती शहरात दर्जेदार आणि शाश्वत बांधकामाची एक नवी चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे.



