Latest NewsMaharashtra

पुढचे चार दिवस पावसाचे! सलग दोन दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, घराबाहेर पडण्यापूर्वी ‘हा’ इशारा वाचाच

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने मुंबई व मुंबई उपनगरात पाऊस बरसत आहे. आज काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. हिच परिस्थिती मंगळवारी पण कायम राहणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्यानं मुंबई, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यभरात येत्या चार दिवसांपर्यंत पावसाचे सत्र सुरूच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज 18 ऑगस्ट रोजी ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

20 ऑगस्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

21 ऑगस्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जि्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

22 ऑगस्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जि्ह्यात काही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरासाठी (मुंबई शहर व उपनगरे) दिनांक 18 ऑगस्ट व 19 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे कृपया टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

मराठवाड्यातही मुसळधार पाऊस
गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवित हानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा बळी गेला आहे. 107 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 698 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 1 लाख 19 हजार 964 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 1 लाख 11 हजार 420.55 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button