Latest News

यवतमाळ बेंबळा प्रकल्प: धरणाचे 6 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

यवतमाळ* – बेंबळा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंमी उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यांतून 126 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांनी सांगितले की, पाण्याची पातळी लक्षात घेऊन विसर्गाचे प्रमाण वेळोवेळी बदलले जाईल. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेचे उपाय करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button