Chhatrapati Sambhaji NagarCrime NewsLatest News

संभाजीनगरमध्ये थरार! तुरुंगातून बाहेर येताच मैत्रिणीवर गोळीबार, म्हणाला, ‘आणखी 2-3 जणींना…

छत्रपती संभाजीनगर मैत्रिणीवर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आली.

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजानं आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या हाताला गोळी लागल्यानं ती गंभीर जखमी झालीये. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तेजाला अटक केलीय. मात्र अटकेनंतरही आरोपी तेजाची पोलिस ठाण्यात मुजोरी सुरु असल्याची दृश्यं कॅमे-यात कैद झालीत.

बाहेर आल्यानंतर आणखी दोन तीन जणींना मारतो अशी धमकी त्यानं दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, तेजा हा अलीकडेच तुरुंगातून सुटून आला होता. हर्सूल जेलमधून बाहेर येताना कुख्यात गुंडाचे मैत्रिणीने हार घालून स्वागतदेखील केले होते. त्यानंतर सोमवारी 11 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तेजा त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तेजाने थेट पिस्तूल काढत गोळीबार केला. गोळी तिच्या हाताला लागल्याने ती जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी तातडीने धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. तसंच, पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली आहे.
कोण आहे हा गुन्हेगार?
तेजा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार, चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसारही कारवाई झाली होती. (तो सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करायचा. नंतर तो काही सराईतांच्या संपर्कात आला अन् गंभीर गुन्हे करू लागला.

2021 मध्ये त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याने तिला चाकूने भोसकल्याचीही नोंद आहे. एप्रिलमध्ये त्याने टीव्ही सेंटर चौकात भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला केला होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच ठिकाणी त्याची धिंड काढली होती. मेमध्ये त्याच्या सासुरवाडीत ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केलेली.

1) गोळीबाराच्या घटनेनंतर काय झाले?
उत्तर: गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तेजाला तात्काळ अटक केली. जखमी तरुणीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  1. तेजाने अटकेनंतर धमकी का दिली?
    उत्तर: अटक झाल्यानंतरही तेजाने पोलिस ठाण्यात मुजोरी दाखवली आणि “बाहेर आल्यानंतर आणखी दोन-तीन जणींना मारतो” अशी धमकी दिली. ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. यामुळे त्याच्या बेलगाम वृत्तीवर आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  2. तेजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे?
    उत्तर: तेजा हा कुख्यात गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर खालील गुन्हे दाखल आहेत: 2021: अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार आणि चाकूने भोसकल्याचा गुन्हा.
    एप्रिल 2025: टीव्ही सेंटर चौकात रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला.
    मे 2025: त्याच्या सासुरवाडीत ड्रग्ज तस्करीचा गोरखधंदा उघडकीस.
    त्याच्यावर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, शस्त्रसाठा, आणि ड्रग्ज तस्करीसह 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button