यवतमाळ हादरले! तिसरी शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गमित्राकडून अत्याचार, बाथरुममध्ये नेलं अन्…

यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून एका तिसरीतील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
Yavatmal Crime Case: यवतमाळमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे. तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शाळा प्रशासनही हादरले असून मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसंच, हे कृत्य करण्यासाठी एका मुलीनेही त्याला मदत केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांत अल्पवयीन मुलगा आणि मुलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला गुप्तांगाजवळ जखमा झाल्या होत्या. याचाच त्रास होत असल्याने तिने त्याच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने लगेचच पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बाभुळगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि मुली विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही अल्पवयीन बालकांना बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे,
दारव्हात महिलेवर अत्याचार
यवतमाळच्या दारव्हा येथे महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या ३४ वर्षीय महिलेला दारव्हा-बागवाडी मार्गावरील एका ले-आउटमध्ये नेऊन पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी काल पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. एक आरोपी अल्पवयीन बालक आहे. पीडिता घटनेच्या दिवशी बहिणी कडून घरी परत येत असताना आरोपींनी तिला रस्त्यात गाठले व ले-आउटवर नेऊन अत्याचार केला. पीडितेच्या बहिणीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.



