Donald Trump Tariffs: अमेरिकेच्या ‘टॅरिफ वॉर’मध्ये छोट्या देशांची उडी, दुखरी नस दाबत ट्रम्प यांना मोठा धक्का! स्पेन, स्वित्झर्लंडसह घरच्या मंडळीनेही केला कडाडून विरोध
Donald Trump Tariff On India : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला आता जगभरातून प्रत्युत्तर मिळण्यास सुरुवात झाली आहे.
Donald Trump Tariffs India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर (Donald Trump Tariff On India) लादण्याच्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ही करवाढ 21 दिवसांनंतर म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. 25 टक्के अतिरिक्त करामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयातकर 50 टक्के झाला आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला आता जगभरातून प्रत्युत्तर
दरम्यान, टॅरिफ वॉरला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला आता जगभरातून प्रत्युत्तर मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशातच याची सुरुवात अमेरिकेच्या एम-35 स्टिल्थ फायटर जेटवर झाला आहे. अनेक देशांनी स्टिल्थ फायटर जेटपासून चार हात लांब राहण्यास सुरुवात केली आहे. युरोपातील लहानसा देश असलेल्या स्पेननं देखील एफ-35 स्टिल्थ लढाऊ विमानं खरेदीच्या निर्णयाला अधिकृतरित्या स्थगित दिली असल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती स्व:त स्पेन सरकारकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान, केवळ स्पेनच नव्हे, तर स्वित्झर्लंडनंदेखील एफ-35 स्टिल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीपासून अंतर राखलं आहे.
तर दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कठोर भूमिकेला घरातूनच विरोध होत असल्याचे दिसून आलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आरोप केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील दशकांपूर्वीच्या धोरणात्मक प्रयत्नांना कमकुवत केले आहे. ते म्हणाले की भारतावर लादलेले 50 टक्के टॅरिफ, विशेषतः रशियन तेल खरेदीवर, भारताला रशिया आणि चीनच्या जवळ आणू शकते.
चीनशी जवळीक भारताशी मात्र कडकपणा, ट्रम्प यांना घरातूनच विरोध
बोल्टन म्हणाले की, ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये चीनशी सौम्य व्यापार संघर्ष सुरू केला होता, परंतु कोणत्याही मोठ्या पावलापासून ते मागे हटले. त्याच वेळी, त्यांनी भारतावर 50% पेक्षा जास्त टॅरिफ लादले, ज्यामध्ये 25% सेकेंडरी टॅरिफ देखील समाविष्ट आहे. ट्रम्प यांनी हा टॅरिफ लादला कारण त्यांनी म्हटले होते की भारत रशियन युद्धयंत्रणेला निधी देत आहे.
बोल्टन पुढे म्हणाले की, या शुल्कामुळे अमेरिकेसाठी ‘सर्वात वाईट परिणाम’ झालाय. कारण भारताने त्याचा तीव्र विरोध केला, विशेषतः कारण चीनवर असा कोणताही टॅरिफ लादण्यात आला नव्हता. ते म्हणतात की या निर्णयामुळे भारताला अमेरिकेविरुद्ध वाटाघाटी करण्यासाठी रशिया आणि चीनसोबत सामील होण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते.



