बाजारातील चढ-उतारातही उत्तम शेअर्स देतील मजबूत परतावा; संभाव्य वाढीसह यादी पाहा

Large Cap Stocks To Buy : आम्ही अशा 6 कंपन्यांची यादी तयार केली आहे. ज्यांचा ताळेबंद मजबूत आहे आणि ज्यांची बाजारातील पकड घट्ट आहे.
आम्ही 10 ऑगस्ट, 2025 रोजीच्या ‘Refinitiv’s Stock Reports Plus’ अहवालात अशा शेअर्ससाठी रेटिंग आणि संभाव्य वाढीबाबत माहिती नोंदवली आहे. त्यानुसार तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे शेअर बाजारात अनिश्चितता आणि अस्थिरता दिसून येत आहे. मात्र, अशा काळातही गुंतवणूकदारांनी शांत राहून योग्य धोरण अवलंबणे महत्त्वाचे आहे. कोणताही तणाव असो किंवा जागतिक घडामोडी, बाजारातील चढ-उतार तात्पुरते असतात, पण गुंतवणुकीची तत्त्वे कायम राहतात. तात्पुरत्या परिणाम करणाऱ्या घडामोडींकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरते.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मंदीच्या काळातही पोर्टफोलिओचे मूल्य सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी मजबूत ताळेबंद आणि अनेक आर्थिक संकटातून यशस्वीरित्या बाहेर पडलेल्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सर्वात उत्तम आहेत. अशा कंपन्या मंदीच्या काळातही तुलनेने चांगली कामगिरी करतात आणि तेजी परत आल्यावर पुन्हा प्रगती करतात.
त्यामुळे सध्या अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे. ज्यांच्या वस्तू किंवा सेवांची मागणी आर्थिक मंदीतही एका विशिष्ट पातळीच्या खाली येत नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्या व्यवसायाचा एक भाग खरेदी करत असता. म्हणूनच, केवळ शेअरच्या नावावर न जाता तुम्ही कोणत्या व्यवसायाचे मालक होत आहात, याचा विचार करा.
आम्ही अशा 6 कंपन्यांची यादी तयार केली आहे. ज्यांचा ताळेबंद मजबूत आहे आणि ज्यांची बाजारातील पकड घट्ट आहे. आम्ही 10 ऑगस्ट, 2025 रोजीच्या ‘Refinitiv’s Stock Reports Plus’ अहवालात अशा शेअर्ससाठी रेटिंग आणि संभाव्य वाढीबाबत माहिती नोंदवली आहे. त्यानुसार तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.
Company Name Reco Upside Potential % Market Cap Rs Cr
NLC India Ltd Strong Buy 34% 32,219
CESC Ltd Buy 28% 21,594
Siemens Ltd Buy 26% 107,931
NTPC Ltd Buy 26% 324,450
Emami Ltd Buy 25% 25,142
United Spirits Ltd Buy 24% 93,817



