Crime NewsJalgaonLatest News
अतिवृष्टी अनुदान घोटाळा, राज्य सरकार अॅक्शन मोडवर, थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश

जालना:-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार असल्याच्या झाला तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महत्वाची बैठक पार पडली.
आता थेट या घोटाळ्या प्रकरणी एफआयआर दाखल केल्या जाणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजविणाऱ्या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणीच खेळू नये,असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. जालना येथे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी जालना आशिमा मित्तल, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी एम, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या बैठकीत त्यांनी हा आदेश दिला.



