Chhatrapati Sambhaji NagarLatest NewsMaharashtra

‘तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ…’; बसचालकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ,’ असे म्हणत स्कूल बसचालकाने 9 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकरणी मुकंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाने नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. दोघे फिरायला जाऊ, आई-वडिलांना घरी येण्यास उशीर होईल, असं सांग, असे म्हणत आरोपी गणेश म्हस्के याने म्हटले. हा संतापजनक प्रकार कामगार चौक ते जय भवानीनगर मार्गावरील एका स्कूल बसमध्ये हा घडला. याप्रकरणी स्कूल बस चालक गणेश संपत म्हस्के याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?
9 वर्षाची मुलगी इंग्रजी शाळेत शिकते. शाळेत 3 वर्षापासून गणेशच्याच व्हॅनने ती जाते. 30 जुलै रोजी दुपारी 2 वाजता व्हॅनमधील सर्व मुले उतरल्यानंतर घरापासून काही अंतरावर व्हॅन थांबवत गणेशने तिचा हात पकडला. तू खूप क्युट आहेस, उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आईवडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे, असे म्हणाला. घरी गेलेली मुलगी दिवसभर शांत होती. त्यामुळे आईवडिलांना संशय आला. रात्री 10 वाजता आईने विश्वासात घेतल्यावर तिने गणेशच्या कृत्याविषयी सांगितले. त्यानंतर सदर मुलीच्या आईवडिलांनी तात्काळ शाळेला या प्रकरणाची माहिती देत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button