Latest NewsMaharashtra

गॅस सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; दृश्य बघून हळहळ व्यक्त कराल!

हैदराबादमधील मेडचल भागात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. संपूर्ण घर कोसळले, एकाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • तेलंगणातील हैदराबादमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
  • स्फोटाच्या हादऱ्यानं अख्खं घर कोसळलं
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

तेलंगणातील हैदराबादमध्ये दुख:द घटना घडली आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये संपूर्ण घर कोसळले. या घटनेमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर एका महिलेची प्रकृती अजूनही गंभीर आहे. सोशल मीडियावर या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

हैदराबादमधील मेडचल भागात ही घटना घडली आहे. माजी एमपीटीसी मुरली यांच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटचा हादरा इतका जोरदार होता की संपूर्ण घर कोसळले. हा स्फोट झाला तेव्हा घरामध्ये दोन व्यक्ती होत्या. त्या घरातच अडकल्या. या घटनेची माहिती तात्काळ बचाव पथकाला देण्यात आली. त्यानंतर बचाव पथकाने या दोन व्यक्तींना बाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टरांकडून गंभीर जखमी असलेल्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. नेमका हा स्फोट शॉर्ट सर्किटमुळे झाला की गॅस गळतीमुळे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. यामुळे आजूबाजूच्या घरांनाही या स्फोटाचा हादरा बसला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button