Latest NewsMaharashtraNanded

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर नांदेडचे दहा पर्यटक अडकले

  • उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर
  • अनेक महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प, रस्तेही खचले
  • नांदेडचे दहा पर्यटक अडकले, सुखरूप ठिकाणी पोहोचण्यासाठी पंचवीस किलोमीटरचा केला पाईप्रवास.
  • दहा पैकी 3 प्रवासी एका ठिकाणी तर 7 प्रवासी दुसऱ्या ठिकाणी
  • नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी केला व्हिडिओ.
  • केंद्र व राज्य सरकारने लवकरात लवकर मदत मदत देण्याची मागणी

उत्तराखंडमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाले महापूर आला आहे. यामुळे महामार्ग बंद झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याच पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटक अडकले आहेत. यातील तीन पर्यटक एका ठिकाणी तर सात पर्यटक दुसऱ्या ठिकाणी अडकले आहेत. सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी सुमारे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केल्याची माहिती आहे. नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत, केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली आहे. आता हे सदरील प्रवासी उत्तर काशी येथील हनुमान चेठी येथे आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button