Latest NewsPune

धावत्या कारमध्ये तरूणाईची जिवघेणी स्टंटबाजी; पुणे बंगळुरू हायवेवर नेमकं काय घडलं?

पुणे-बंगळुरू महामार्गावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर तरुणांनी भरधाव वेगात चाललेल्या गाडीतून जीवघेणे स्टंट केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

वेळे ते पाचवड या दरम्यान हा प्रकार घडला असून, एका भरधाव चारचाकी गाडीतून चार तरुण-तरुणी अत्यंत धोकादायक पद्धतीने स्टंट करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक तरुण आणि एक तरुणी गाडीच्या सनरूफमधून (Sunroof) बाहेर उभे आहेत, तर इतर दोन तरुण दोन्ही बाजूंच्या खिडक्यांमधून डोके बाहेर काढून स्टंट करत आहेत.

हा संपूर्ण थरार एका वाहनचालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हे तरुण अत्यंत बेदरकारपणे स्टंट करत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. अशा प्रकारच्या स्टंटमुळे केवळ त्यांचाच नव्हे तर इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. स्टंटबाजी करताना तोल गेल्यास किंवा गाडीने अचानक वळण घेतल्यास रस्त्यावर पडून गंभीर दुखापत होऊ शकते किंवा मृत्यूही होऊ शकतो.

अनेकदा सोशल मीडियावर ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी तरुण अशा प्रकारच्या धोकादायक स्टंटबाजीचे व्हिडीओ बनवतात. मात्र, यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ होतो. त्यामुळे अशा बेजबाबदार कृत्ये करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button