Latest NewsMaharashtra

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव, दोन गटात मारहाण; शहरात तणावाचे वातावरण

यवत : सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पुणे जिल्ह्यातील यवत परिसरात तणाव निर्माण झाला असून, दोन गटांमध्ये जोरदार मारहाणीची घटना घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका युवकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यानंतर यवतमध्ये दोन गट आमने-सामने आले. या घटनेने हिंसक वळण घेतले असून, जमावाकडून दुकाने, ऑफिसेस, जेसीबी व अन्य वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

तणाव वाढल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधारांच्या नळकांड्यांचा वापर केला.

दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ठळक बाबी:

सोशल मीडियावरील पोस्टमुळे दोन गटात तणाव

दुकानं, ऑफिस आणि जेसीबीची तोडफोड

पोलिसांकडून अश्रुधारांचा वापर

शहरात मोठा बंदोबस्त

पोलिस प्रशासन सतर्क असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी यवत परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button