“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाचनालयाचे उद्घाटन; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना पुस्तक भेट”
अमरावती : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या विशेष प्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण ठेवत नागरिकांसाठी वाचनसंस्कृती वाढविण्याच्या हेतूने ‘अभ्यागत वाचनालयाचे’ उद्घाटनही आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना माहिती, ज्ञान व साहित्याशी नवे नाते निर्माण करता येणार आहे.
कार्यक्रमाच्या दरम्यान उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी मा.आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना साहित्यावर आधारित एक पुस्तक भेट दिले. ही भेट त्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची आठवण करून देणारी ठरली.
यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य अभिनेता सर्जेराव गलपट यांनी वाचन केले.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, वृक्षप्राधिकरण तांत्रिक सदस्य मधुकर घारड, विलास देशमुख, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, अभियंता राजेश आगरकर, अभिनेता सर्जेराव गलपट, सुनिता गुर्जर, प्रमोद मोहोड, भूषण खडेकार, सिमंत गजभिये, शिवा फुटाणे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
साहित्यिक व सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला मानवंदना देण्यात आली.



