जगदीप धनखड यांचा राजीनामा; उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला

नवी दिल्ली : भारतीय उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. नवीन उपराष्ट्रपतीची निवड 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. इच्छुक उमेदवार 21 ऑगस्ट 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा 21 जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले असून, त्यामुळे नवीन निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेचा तपशील:
निवडणुकीची तारीख: 9 सप्टेंबर 2025
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2025
छाननी व माघार घेण्याची अंतिम मुदत: लवकरच जाहीर
उपराष्ट्रपतीची निवड खासदारांद्वारे होत असून, लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य मतदानात भाग घेतात. राजकारणातील अनेक मोठ्या नावांची उमेदवारी शक्य असल्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय हालचालींना वेग:
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू झाली असून, विरोधक व सत्ताधारी पक्ष दोघेही आपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.



