पवन नगर, अमरावती येथे डेंगू जनजागृती व स्वच्छता अभियानाचे आयोजन
अमरावती : शहरी आरोग्य केंद्र, महेंद्र कॉलनी, अमरावती अंतर्गत अहिल्या महिला आरोग्य समितीच्या वतीने पवन नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत डेंगू तसेच इतर साथीच्या रोगांबाबत जनजागृती करण्यात आली.
आरोग्य सेवक मनीष हटवार व उमेश जाधव यांनी महिलांना डेंगूविषयी महत्त्वाची माहिती दिली. डासांची पैदास टाळण्यासाठी घ्यावयाच्या स्वच्छता उपाययोजना, पाण्याचे साठे टाळणे आणि घराभोवती साफसफाई कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अहिल्या महिला आरोग्य समितीच्या सचिव आशा वर्कर संध्या पाटील, अध्यक्ष परविना आठवले, आरोग्य सेविका वैशालीताई सुरवसे व कल्पना वानखडे, तसेच महिला कार्यकर्त्या सिंधुताई ढवळे, उज्वला मात्रे, अक्षरा कीर्तनकार, कांताबाई मरकाम, मोहोळ इत्यादी महिलांचा सक्रिय सहभाग होता.
या उपक्रमामुळे पवन नगर परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्य विषयक जागरूकता निर्माण झाली असून, महिलांचा सहभाग विशेषतः उल्लेखनीय ठरला.



