विद्यापीठाचा अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम विद्याथ्र्यांच्या भविष्याला दिशा देणाराएम.टेक. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागात एम.टेक. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स) या व्दीवर्षीय चार सेमिस्टर पूर्णवेळ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी आहे.
आर्टीफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स काय आहे?
कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजे संगणक आणि मशिनला मानवाच्या बुध्दीमत्तेसारखे कार्य करण्याची क्षमता प्रदान करणे. हे एक विशाल असे क्षेत्र आहे, ज्यात मशिन लर्निंग, डीप लर्निंग, नैतिक बुध्दीमत्ता आणि नैसर्गिक भाषा प्रक्रियेसारख्या तंत्राचा समावेश होतो. ए.आय. चा वापर मानवाच्या विचारशक्तीला स्वयंचलित करण्यात येते. अर्थात ए.आय. तंत्रज्ञान मशिनला निर्णय घेणे, शिकणे, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता देतो.
डेटा सायन्स हे एक विज्ञानच आहे. डेटाचे संकलन, विश्लेषण आणि त्यावरुन निर्णय घेण्याची प्रक्रिया समाविष्ट करतो. डेटा सायन्स गणित, सांख्यिकी, संगणक विज्ञान आणि व्यवसाय विश्लेषण याचे मिश्रण असते. डेटा सायन्सचा मुख्य उद्देश म्हणजे मोठ¬ा प्रमाणावर असलेल्या डेटाचा विश्लेषण करुन त्यातून उपयुक्त माहिती काढणे आणि त्यावरुन योग्य निर्णय घेणे होय.
आर्टीफिशियल इंडेलिजन्स अॅन्ड डेटा सायन्स अभ्यासक्रम लोकप्रिय क्षेत्र
आर्टीफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन मानवी बुध्दीमत्तेसारखे काम करणारे मशिनमधील सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये तयार करणे, कृत्रिम बुध्दीमत्ता आणि डेटा सायन्स हे दोन महत्वाचे तंत्रज्ञान एकमेकांशी पुरक आहेत. डेटा सायन्स आणि ए.आय. च्या सहकार्यामुळे विविध उद्योग, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनातील अनके कार्य अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि स्वयंचलित होवू शकतात. डेटा सायन्स आणि ए.आय. यांचा एकत्रित वापर आपल्याला अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम निर्णय घेण्यास मदत करतो. ई कॉमर्स, आरोग्य सेवा, उद्योगांचे परिवर्तन, नवीन तंत्रज्ञान, शिक्षण आणि संशोधन, वाहतूक, उत्पादन व इतर अनेक उद्योगांमध्ये ए.आय. आणि डेटा सायन्समुळे मोठ¬ा प्रमाणात बदल होत आहेत.
रोजगाराच्या अमाप संधी
रोबोटिक्स अभियंता, विझनेस अॅनॉलिटिक्स, ए.आय. रिसर्च सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, मशिन लर्निंग इंजिनिअर, डेटा आर्किटेक्ट, एन.एल.पी. विशेषज्ञ, डेटा सायंटिस्ट या पदांसाठी मोठ¬ा प्रमाणात मागणी वाढत आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट¬े
सध्या तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत असलेल्या आणि परिवर्तन घडविणा-या जगात कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आणि डेटा सायन्स या दोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये मोठ¬ा प्रमाणात महत्व वाढले आहे. दोन्ही क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग झाले आहेत व त्यांच्या विविध उद्योग, व्यवसाय, समाजावर प्रभाव दिसून येतो. तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे केवळ जीवनमान सुधारत नाही, तर विविध नवे उद्योग, संधी, कार्यपध्दती देखील उभी राहतात.
या अभ्यासक्रमामध्ये मशिन लर्निंग, डीप लर्निंग, पॅटर्न रिक्गनायझेशन, स्पीच प्रोसेसिंग, इमेज अॅन्ड व्हिडिओ प्रोसेसिंग, एज कॉम्प्युटींग, एन.एल.पी., कॉम्प्युटेशनल लर्निंग अशा अनेक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या सोबतच प्रात्याक्षिके, प्रोजेक्ट, इटर्नशिप अंतर्भूत करण्यात आले आहे. अभ्यासक्रमासाठी विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रतिष्ठीत संस्थांमधील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी विद्याशाखेतील पदवी किंवा विज्ञान विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी, नॉन झिरो गेट स्कोअर इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेवू शकतात. प्रवेश क्षमता 18 निश्चित करण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रिया
उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सद्यस्थितीत या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया डी.टी.ई. मार्फत सुरू आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता इच्छूक विद्याथ्र्यांनी प्रवेश अर्ज सादर करुन आपले प्रवेश निश्चित करावेत आणि आपल्या रोजगाराच्या संधी प्राप्त करुन घ्याव्यात. अधिक माहितीकरिता डॉ. एस.एन. काळे मो. 9422917714, प्रा. डी.आर. सोळंके मो. 7387888873 यावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. सुजाता काळे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.



