AmravatiLatest News

“राजापेठ ते बडनेरा – सौंदर्यीकरणासाठी आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची प्रत्यक्ष पाहणी”-“आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांचा शहर सौंदर्यीकरण गतिमान करण्याचा निर्धार”

अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी शहरातील राजापेठ, फर्शीस्‍टॉप, दस्‍तुरनगर, नवाथे चौक, अलमास नगर जुनीबस्‍ती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समता चौक, शिवाजी महाराज पुतळा आठवडी बाजार, बडनेरा परिसरातील सौंदर्यीकरणाची पाहणी केली.

या दौऱ्यात या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सौंदर्यीकरण आणि विकास कामांचा आढावा घेण्यात आला. कामांच्या प्रगतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली व आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या.
आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, “शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण करून त्यांना आधुनिक सुविधांसह सुसज्ज करणे, हा महानगरपालिकेचा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि अभिमानास्पद सार्वजनिक स्थळे मिळावीत यासाठी ही कामे वेळेत आणि दर्जेदाररीत्या पूर्ण केली जातील.”

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत अशी सौंदर्यीकरण कामे युद्धपातळीवर सुरू असून, यामध्ये नागरिकांचे सहकार्यही अपेक्षित आहे.
आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी संबंधीत अधिका-यांना निर्देश दिले की, सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. सौंदर्यीकरणासंबंधी सुरू असलेली सर्व कामे ठरवलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदार व अभियंत्यांना देण्यात आले. गुणवत्तेवर कोणताही तडजोड नको. रस्ते, फूटपाथ, दिवाबत्ती, शौचालये, बागा, पुतळ्यांची रंगरंगोटी इ. बाबतीत दर्जेदार व टिकाऊ साहित्य वापरण्यावर भर द्यावा. परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवावा. काम सुरू असलेल्या भागात कचरा व माती न ठेवता नियमित स्वच्छता राखण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक ठिकाणी माहिती फलक लावावेत. नागरिकांना कामाची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक सौंदर्यीकरण प्रकल्पस्थळी माहिती फलक लावावेत. स्थानीय नागरिकांचा सहभाग घ्यावा. परिसरातील नागरिक व स्थानिक संस्थांशी समन्वय साधून कामात पारदर्शकता व सहभाग सुनिश्चित करावा. दिवसा व रात्रीच्या वेळेस सुरक्षेची काळजी घ्यावी. रस्त्यावर सुरू असलेल्या कामांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी योग्य संकेतक व सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले. पुतळे व स्मारकांचे संवर्धन व्हावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या आसपासचा परिसर सुसज्ज व भव्य ठेवावा. कामांची नियमित पाहणी केली जाईल. संबंधित अधिकारी हे कामांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेतील, आणि आवश्यक असल्यास पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, “अमरावती शहर हे आपल्या सर्वांचे आहे. शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण सुरु असून नागरिकांनीही याची काळजी घेणे गरजेचे आहे. महानगरपालिका विविध भागांमध्ये स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी विविध प्रकल्प राबवत आहे. आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी अमरावतीकर नागरिकांना आवाहन केले की, या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता राखावी, वृक्षसंवर्धनात सहभागी व्हावे, तसेच सुरू असलेल्या कामांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले सूचनांनी व सकारात्मक सहभागाने आम्हाला अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. शहराच्या विकासासाठी प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय हाच यशाचा मूलमंत्र आहे. चला, आपण सगळे मिळून ‘स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध अमरावती’ घडवूया!”
या पाहणी दौऱ्यात उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त धनंजय शिंदे, उपअभियंता (प्रकल्‍प) सुहास चव्‍हाण, पोलीस निरीक्षक, उपअभियंता श्रीरंग तायडे, अजय विंचुरकर, मंगेश कडू, अभियंता राजेश आगरकर, शरद तिनखेडे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, शारदा गुल्‍हाणे, अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button