AmravatiLatest News

प्रयास विशेष शाळेत मतीमंद विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; किटकजन्य आजारांबाबत जनजागृती

अमरावती : अमरावती महानगरपालिका शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन अंतर्गत क्रांती कॉलनी येथील ‘प्रयास’ विशेष शाळेत मतीमंद विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन (HB) चाचणी तसेच विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना परिसरातील दूषित कंटेनर्स दाखवून डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारीबाबत समुपदेशन करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. अश्विनी खडसे, आरोग्य सेविका हेमलता मेश्राम, हर्षा पवार, शितल कोल्हे, राहुल घूरडे आणि शरद सावळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी घेतलेला हा उपक्रम पालकवर्ग, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुकास्पद ठरवला असून भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button