AmravatiLatest News

विद्यापीठातील एम.बी.ए. विभागात दोन दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड मॅनेजमेंट (एम.बी.ए.) विभागामध्ये नुकताच दोन दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, डॉ. राजेश सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.

पहिल्या दिवशी विभागप्रमुख डॉ. डी.वाय. चाचरकर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत असलेले अभ्यासक्रम, एन.आय.आर.एफ., यू.डी.आर.एफ. रँकिंग संदर्भात विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. प्रा. सागर शाह यांनी परीक्षा पध्दती, मूल्यांकन प्रकार, सतत मूल्यांकन, परीक्षक, पेपर सेटींग यासंदर्भात माहिती दिली. प्रा. पल्लवी कांडलकर यांनी केस स्टडी, अनुभवाधारित अध्यापन, फ्लिड क्लासरूम यासारख्या नवीन अध्यापन पध्दतीवर प्रकाश टाकला. तसेच स्पेशलायझेशननुसार लेसन प्लॅन तयार करण्याचे महत्व विषद केले. डॉ. संध्या भगत यांनी संवादात्मक अध्यापन, विद्यार्थी क्लब्स, मानसिक आरोग्याचे महत्व, परस्पर शिकवण यांवर माहिती दिली.

दुस-या दिवशी डॉ. चाचरकर यांनी केस स्टडी, मूल्यांकन कसे करावे हे उदाहरणांसह स्पष्ट केले. प्रा. दिग्विजय लकडे व प्रा. सर्वेश राठी यांनी फिल्ड व्हिजिट्स, लाईव्ह प्रोजेक्टस्, कौशल्यविकास, विद्याथ्र्यांच्या सी.व्ही. सुधारणा याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. अमोल लसणकर यांनी संशोधन प्रकल्प, प्रबंध, विषय निवड, पध्दतशील लेखन, जर्नल्समधून प्रकाशन याबाबत माहिती दिली. तसेच फॅकल्टी-इंडस्ट्री सहयोगातून सल्लागार संशोधनाची संधी उलगडून दाखविली. प्रा. आशीष देशमुख यांनी ऑनलाईन कोर्सेसचा उपयोग करुन अध्यापन अधिक प्रभावी कसे करता येईल, विद्याथ्र्यांचा सहभाग, सेफ-पेस्ड लर्निंग, ग्लोबल कंटेटचा वापर याबाबत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन केले.

याप्रसंगी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. मुक्ता मंत्री, प्रा. पल्लवी कांडलकर उपस्थित होत्या. समारोपीय सत्राला विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सी.ए. पुष्कर देशपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. त्यांनी प्राध्यापकांचा विकास, उच्च शिक्षणातील सध्याच्या घडामोडी, संस्थात्मक सुधारणा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना नव्या कल्पना, सहयोगी उपाय, प्रभावी अध्यापनासाठी लागणारी साधने याबाबत मोठी प्रेरणा मिळाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button