AmravatiLatest News

देश आणि समाजाच्या फायद्याच्या दृष्टीने संशोधन व्हावे – कुलगुरू डॉ. मिलींद बारहातेविद्यापीठात प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटनयुजीसी-मालवीय मिशन टिचर्स ट्रेनिंग सेंटर आणि विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाचा संयुक्त उपक्रम

अमरावती : भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मोठ¬ा प्रमाणावर संशोधन होत आहे, असे असले तरी संशोधनाचा देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल, यादृष्टीने संशोधकांनी संशोधन करावे, असे आवाहन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले.  प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत विद्यापीठात युजीसी-मालवीय मिशन टिचर्स ट्रेनिंग सेंटर आणि विद्यापीठाचा गृहविज्ञान विभाग यांचे संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा ज्ञानरुाोत केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. वैशाली गुडधे, सिम्बॉसिस सेंटर फॉर रिसर्च अॅन्ड इन्नोव्हेशन, पुणेच्या माजी संचालक डॉ. रुचिका कौल घाणेकर, गृहविज्ञान विभागप्रमुख तथा कार्यशाळेच्या संयोजक डॉ. वैशाली धनविजय उपस्थित होत्या. 
कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केल्यानंतर सहभागी विद्याथ्र्यांना संबोधित करतांना कुलगुरू म्हणाले, संशोधन देशाच्या प्रगतीसाठी महत्वाची बाब आहे.  देश विकासाचा कणा हा संशोधनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.  अमेरिकासह इतर देशांनी गुणवत्तापूर्ण संशोधन केल्यामुळे त्यांचा विकास अधिक झाला आहे.  भारत क्वॉन्टिटी संशोधनामध्ये खूप पुढे आहे, पंरतू क्वॉलिटी संशोधनामध्ये मागे आहे.  इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये भारताचा बेचाळीसवा क्रमांक आहे.  त्यामुळे आपल्या देशाला व मानवजातीला उपयुक्त संशोधनावर उदयोन्मुख संशोधकांनी संशोधन केले पाहिजे.  केवळ आचार्य पदवीसाठी संशोधनाचा उद्देश नसावा.  स्टार्टअप मुळे भारतात मोठी प्रगती होत आहे.  नवीन शैक्षणिक धोरणामुळे विविध कौशल्ये विद्याथ्र्यांना आता मिळणार आहे.  अनेक क्रांतीकारक बदल होत असल्यामुळे आमचा विद्यार्थी कौशल्याने सर्वसमावेशक असा घडणार आहे.  आयोजित कार्यशाळा उदयोन्मुख संशोधकांसाठी निश्चितच एक नवीन संधी घेवून येणार असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले.

प्रमुख अतिथी डॉ. वैशाली गुडधे म्हणाल्या, विद्यापीठाच्या ज्ञानरुाोत केंद्रामध्ये अनेक डाटा जर्नल्स, डाटा बेस ई-बुक, रिपोझिटरी आदी सुविधा विद्याथ्र्यांच्या ज्ञानार्जनासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.  ई-शोधसिंधू, शोधगंगा वर मोठ¬ा प्रमाणावर संशोधनाकरीता डाटा उपलब्ध आहे.  संशोधन करणाया विद्याथ्र्यांनी याचा फायदा घ्यावा, याशिवाय शोधचक्र सुद्धा संशोधकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे.  महिला संशोधकांसाठी शेरनी ची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन दिलेली आहे.  विद्याथ्र्यांनी विशेषत: संशोधकांनी विद्यापीठातील ज्ञानरुाोत केंद्राच्या संकेतस्थळाला भेट देवून संशोधनासाठी आवश्यक माहिती मिळवावी आणि यामध्ये जास्तीतजास्त विद्याथ्र्यांचा सहभाग असावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे प्रतिमा पूजन, विद्यापीठ गीत व मान्यवरांचा सत्कार करुन कार्यशाळेला सुरुवात झाली.  गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी पाच दिवसीय कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद करुन साठ संशोधक विद्याथ्र्यांनी या कार्यशाळेसाठी नोंदणी केल्याचे सांगून हॅन्ड्स ऑन सेशन सुद्धा कार्यशाळेत होणार असल्याची माहिती दिली.  संचालन कु. अनुश्री आडे हिने, तर आभार डॉ. दिपाली भैसे यांनी मानले.  कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. यादवकुमार मावळे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. संयोगिता देशमुख, बायोटेक्नॉलॉजी विभागातील डॉ. अनिता पाटील तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक व संशोधक विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button