AmravatiLatest News
सरन्यायाधीश भूषण गवई यांचे माहेश्वरी, जैन आणि खंडेलवाल समाजाकडून भव्य स्वागत
अमरावती: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले असता, माहेश्वरी समाज, जैन समाज आणि खंडेलवाल समाजातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
सरन्यायाधीश गवई यांचे स्वागत करण्यासाठी सुरेश साबू, सुरेश साधने, विनोद डागा, गौतमचंद संख्ये, घनश्याम खंडेलवाल, सुर्वे डागा, वसंत कल्याण त्रि, नंदकिशोर कलंत्री आणि राजकुमार कलंत्री यांसारखे मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या विविध घटकांनी एकत्र येऊन देशाच्या सर्वोच्च न्यायपीठाचे प्रमुख असलेल्या गवई यांचे स्वागत केल्याने हा क्षण शहरासाठी एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद ठरला.
सरन्यायाधीशांच्या या भेटीमुळे स्थानिक समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



