AmravatiLatest NewsLocal News

श्रद्धानंद इंग्लिश हायस्कूलमध्ये डेंगू जनजागृती व कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम संपन्न

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय, मसानगंज, अमरावती यांच्या वतीने श्रद्धानंद इंग्लिश हायस्कूल, अशोक नगर येथे डेंगू जनजागृती व कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डेंगू व अन्य कीटकजन्य रोगांविषयी जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. विशाल काळे, साथरोग अधिकारी डॉ. रुपेश खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्मास मॅडम, शेख हैदर अली (Ha), डॉ. धनवटे सर, मुख्याध्यापिका भारती बोके (Hm), मालती ठाकरे (Hm), PHN ज्योती वानखडे, शशांक निवाने, चोपडे (Mpw) तसेच ANM, आशा स्वयंसेविका व बिल्डिंग चेकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कीटकजन्य रोगांची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, स्वच्छता व स्थानिक पातळीवरील सहभाग यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रात्यक्षिके व माहितीपर सादरीकरणे देखील घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री वानखडे यांनी केले तर श्रुती बढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button