Amaravti GraminLatest News

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा चांदूर रेल्वे उपविभाग दौरा, ‘माझी सुंदर शाळा’ अभियान, सूतगिरणी व रोपवाटिकेची पाहणी

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूररेल्वे उपविभागातील नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिक्षण, उद्योग, वनीकरण, कृषी आणि प्रशासकीय कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला.

  'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानाला प्रोत्साहन:

   नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा पीएम श्री दाभा येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. या शाळेने 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हाधिकारी यांनी या शाळेतील विविध अभिनव उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शाळेतील आयसीटी (ICT) लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी 'मिशन आरंभ' अंतर्गत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांना शैक्षणिक कार्याविषयी सूचना दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.  शिक्षकवृंद तसेच  विद्यार्थ्यांचे  'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविल्याबाबत अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button