अकोल्यात जमीअत उल कुरैशच्या गोमांस विक्री बंदीच्या निर्णयाला व्यापक पाठिंबा

अकोला : महाराष्ट्रातील जमीअत उल कुरैश संघटनेने गोधन कायद्याचे पालन करत गोमांस विक्री अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला अकोला शहरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. उलमा-ए-किराम यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत समाजातील अनेक जबाबदार व्यक्ती आणि मान्यवरांनी उपस्थित राहून या निर्णयाप्रती एकजूट दर्शवली.
सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम खान यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ अहमद खान यांनी केले. हाफिज अकरम साहेब यांनी कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर मुफ्ती इरशाद साहेब यांनी नात शरीफ सादर केली. या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान मौलवी बाबा साहेब यांनी भूषविले.
या बैठकीत मौलाना जब्बार साहेब, मौलाना वसीउल्लाह साहेब, मुफ्ती ज़िकरुल्लाह साहेब, मुफ्ती इरशाद साहेब, हाफिज सादिक साहेब, मोहम्मद सिद्दीक हाजी वझीर खान साहेब, मा. नगरसेवक नकीर खान, मोहम्मद इरफान, मोइन खान (मोंटू भाई), किशोर मानवटकर, रणजीत वाघ, शहीद खान, मुजाहिद पठाण, गुड्डू भाई, शेख आसिफ, बाड़ू भाऊ, सय्यद वसीम खदान, सईद पहलवान यांच्यासह अनेक मान्यवर व समर्थक उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित वक्त्यांनी स्पष्ट केले की, जमीअत उल कुरैशने कायदा आणि न्यायाच्या चौकटीत राहून आपला लढा पुढे नेण्याचा मार्ग स्वीकारला आहे. अकोल्यातील मुस्लिम समाज कुरैश बिरादरीच्या या निर्णयासोबत ठामपणे उभा असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
प्रतिनिधी: गुलाम मोहसिन



