शहरी आरोग्य केंद्र व मनपा दवाखाना आयसोलेशन, अमरावती येथे स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार

अमरावती : मनपा झोन क्र.२ अंतर्गत येणाऱ्या शहरी आरोग्य केंद्र व मनपा दवाखाना आयसोलेशन, अमरावती येथे दिनांक २३ जुलै २०२५ रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. हे अभियान मनपा झोन क्र.२ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
स्वच्छता अभियानअंतर्गत आयसोलेशन विभागाच्या परिसरातील संपूर्ण गवत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने कापण्यात आले. संडास व बाथरूमची स्वच्छता करण्यात आली. तसेच आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या आतील भागातील जाळ्या, खिडक्या आणि मजले नीटनेटके पुसण्यात आले. वरील मजल्यावरील (टेरेसवरील) संपूर्ण कचरा देखील स्वच्छ करून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी करण्यात आला.
सदर उपक्रमात शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशनच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे व मनपा दवाखाना आयसोलेशनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी मार्गदर्शन केले. या अभियानामध्ये सर्व वैद्यकीय कर्मचारी, आशा वर्कर्स व स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्रित सहभाग घेत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे “स्वच्छ अमरावती, आरोग्यदायी अमरावती” या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले.
यावेळी जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक रोहीत हडाले, स्वच्छता कर्मचारी, पारिचारीका, आशा वर्कर, मनपा कर्मचारी उपस्थित होते.



