AmravatiLatest NewsLocal News
अमरावती महानगरपालिकेत लोकमान्य बाळगंगाधर टिळक जयंती साजरी
अमरावती : बुधवार दिनांक २३ जुलै,२०२५ रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. लोकमान्य बाळगंगाधर टिळक जयंती निमित्य महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे हस्ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, धनंजय शिंदे, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, उपअभियंता श्रीरंग तायडे, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, सिमंत गजभिये, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



