विद्यापीठात अप्रेंटीसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (ए.ई.डी.पी.) अंतर्गत नवीन अभ्यासक्रम सुरू

अमरावती – अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अप्रेंटीसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (ए.ई.डी.पी.) अंतर्गत दोन महत्त्वाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये बी.एस्सी. (डेटा सायन्स अॅन्ड अॅनॅलिटिक्स) आणि बी.कॉम. (रिटेल मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सदर दोन्ही अभ्यासक्रम विद्याथ्र्यांना उद्योजक व औद्योगिक क्षेत्राचे सखोल ज्ञान देऊन त्यांना भविष्यातील करिअरसाठी तयार करण्याच्या उद्देशाने आखण्यात आले आहेत.
अभ्यासक्रमांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट¬ म्हणजे विद्याथ्र्यांना सहाव्या सत्रात सहा महिन्यांची ‘इंडस्ट्री अप्रेंटीसशिप’ (औद्योगिक शिकाऊ उमेदवारी) करावी लागणार आहे. यामुळे विद्याथ्र्यांना औद्योगिक वातावरणात काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल व उद्योगाच्या गरजा समजून घेण्यास मदत होईल.
सहा नामांकित उद्योजकांसोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार
या उपक्रमासाठी विद्यापीठाने डॉट कॉम इन्फोटेक प्रा. लि., लॉजिक व्हायरल टेक्नॉलॉजी प्रा.लि., अस्फेट इंटिग्रेटेड आयटी प्रा.लि., सॉफ्ट सेन्स टेक्नोसॉर प्रा.लि., घरकुल इंडस्ट्रीज प्रा.लि. आणि एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशन, अमरावती या सहा नामांकित उद्योगांसोबत सामंजस्य करार केले आहेत.
उद्योजकता व औद्योगिक कौशल्यांना चालना
या सामंजस्य करारामुळे विद्याथ्र्यांना गुणवत्तापूर्ण अप्रेंटिसशिप संधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल. एवढेच नव्हे, तर अप्रेंटिसशिप करीत असतांना विद्याथ्र्यांना विद्यावेतन देखील मिळणार आहे. यासाठी विद्यापीठाचा ‘बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सोबत लवकरच करार होणार आहे. यामुळे विद्याथ्र्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि शिक्षणासोबतच व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी देखील प्राप्त होईल. विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रमाची विद्याथ्र्यांना केवळ पदवीधारक न बनविता उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी परिपूर्ण करण्यास मदत मिळेल व रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होऊन विद्याथ्र्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचेसह प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, ननसा संचालक डॉ. अजय लाड उपस्थित होते.



