BhandaraLatest News

डोंगरगाव येथील वीज वितरण कंपनीतील शाखा अभियंता पंधरे ह्यांची हिटलरशाही!

भंडारा : साकोली तालुक्यातील सर्वात मोठ्या सानगडी ग्रामपंचायतीने प्रीपेड मीटर बसवण्याबाबत घेतलेला ठराव डोंगरगाव/सानगडी येथील वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता पंधरे यांनी चक्क धुडकावून लावला आहे. स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही त्यांनी गावात प्रीपेड मीटर बसवण्याचा सपाटा सुरू ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सानगडी ग्रामपंचायतीने नागरिकांच्या तक्रारी आणि विरोधाची दखल घेत, गावात नागरिकांच्या परवानगीशिवाय प्रीपेड मीटर लावू नये, असा ठराव पारित केला होता. मात्र, शाखा अभियंता पंधरे यांनी या ठरावाला केराची टोपली दाखवली आणि आपली ‘हुकूमशाही’ सुरूच ठेवली, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

काही नागरिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना बळजबरीने मीटर लावले जात असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

ग्रामपंचायत आणि नागरिकांनी असा इशारा दिला आहे की, यापुढे जर विनापरवानगी मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि ग्राहकांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी : साहिल रामटेके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button