AmravatiLatest News

गप्पी मासे धडक मोहीमेची अमरावतीत प्रभावी सुरुवात – डास निर्मूलनासाठी महानगरपालिकेचा पुढाकार

अमरावती : डेंग्यू, मलेरिया व इतर पाणजन्य आजारांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज दि. २२/०७/२०२५ रोजी शहरी आरोग्य केंद्र, भाजीबाजार, महानगरपालिका अमरावती अंतर्गत वल्लभ नगर, पार्वती नगर, छाया कॉलनी, जया कॉलनी व पुरुषोत्तम नगर या परिसरात गप्पी मासे धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरंजे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष डासोत्पत्ती स्थानांवर गप्पी मासे सोडून मोहिमेला सुरूवात केली.

गप्पी मासे हे पाण्यामध्ये डासांची अळी खाऊन नष्ट करतात, त्यामुळे डासांची वाढ थांबते व डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते.
या मोहिमेत आरोग्य सेवक जयस्वाल, आशा वर्कर रुपाली लोंढे, तसेच ब्रिडींग चेकर प्रथमेश पिंजरकर व प्रीया साबळे यांनी सहभाग घेतला. त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करत डास निर्मूलनाच्या उपायांबाबत माहिती दिली.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, घराजवळील पाणी साचू न देता, पाणी साठवणुकीची योग्य व्यवस्था ठेवून व अशा मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन डासमुक्त आणि आरोग्यदायी अमरावतीच्या निर्मितीत सहकार्य करावे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button