AmravatiLatest News

विद्यापीठातर्फे पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोल विषयावरसंशोधन प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्यास 25 जुलै पर्यंत मुदतवाढ

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र द्वारे ‘पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोल’ या विषयावर संशोधन प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून ‘शिक्षण व रोजगारामध्ये जिल्ह्राची स्थिती : कालावधी 2015 ते 2025’ या विषयावर संशोधन प्रकल्पासाठी रू. 20,000/- अनुदान दिले जाणार आहे.

जिल्ह्राची शैक्षणिक प्रगती अभसण्यासाठी वर्ग दहावी, बारावी व पदवी स्तरावरील विद्यार्थी गळतीचे प्रमाण तपासणे, उच्च शिक्षण व संशोधनामध्ये जिल्ह्रातील उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा अभ्यास करणे, उच्च शिक्षण व संशोधनामध्ये पदव्युत्तर व संशोधनामधील मुलामुलींची प्रगती अभ्यासणे, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील महाविद्यालयांमधील विद्याथ्र्यांचे व सरकारी, खाजगी क्षेत्रातील नोकरीची स्थिती अभ्यासणे, केंद्र सरकार व राज्य सरकारद्वारा संचालित स्वयंरोजगार, मुद्रा, स्टार्टअप, कर्ज योजनांच्या प्रगतीचा अभ्यास करणे, शिक्षण व रोजगारासाठी जिल्ह्राचा विकास आराखडा तयार करणे, आदी संशोधनाची उद्दिष्ट¬े असून संशोधन प्रकल्पाकरीता प्रस्ताव सादर करण्यास 30 जून, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आलेल्या विनंतीचा विचार करुन संशोधन प्रकल्प सादर करण्यास आता 25 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक सदर संशोधन प्रकल्पाकरीता अर्ज करु शकतात. डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी यासंदर्भात संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून कळविले असून प्रस्ताव डॉ. महेंद्र वि. मेटे, समन्वयक, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती या पत्त्यावर पाठविता येईल. अधिक माहितीकरीता समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांचेशी 9421739996 यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button