विद्यापीठाच्या सांख्यिकीशास्त्र विषयात विद्याथ्र्यांना उज्ज्वल भविष्याची संधी प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती : सांख्यिकीशास्त्राचे व्यवहारात मोठे महत्व आहे. कळत न कळत सांख्यिकीशास्त्र दैनंदिन व्यवहारामध्ये वापरले जात आहे. त्यामुळे डेटा सायन्सच्या काळात तर त्याचे महत्व अधिकच वाढले आहे. म्हणूनच सांख्यिकीशास्त्रात विद्याथ्र्यांना उज्जवल भविष्याच्या मोठ¬ा संधी उपलब्ध आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सांख्यिकीशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्याथ्र्यांनी आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.
सांख्यिकीशास्त्राचा जगताशी संबंध
सांख्यिकीशास्त्र हा विषय डेटा सायन्सचा आत्मा आहे. संगणकावर काम करीत असले तरी, मूळ संकल्पना सांख्यिकीशास्त्रामधीलच असतात. सांख्यिकीशास्त्राचा जगताशी संबंध असून डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातील परस्पर संबंध कसे ओळखावे हे सर्व सांख्यिकीशात्र विषयामध्ये येते. आर्टीफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) मधील जे लर्निंग आहे, त्यात डेटा इन्पुट म्हणून द्यावा लागतो. त्यातही सांख्यिकीशास्त्राचे महत्व अधिक आहे. डेटा विश्लेषणामध्ये सांख्यिकीशास्त्र विषयाची मजबुत पार्·ाभूमी आहे व उत्तीर्ण होणा-या विद्याथ्र्यांना मोठमोठ¬ा नामांकित कंपन्या, उद्योग क्षेत्रच नाही, तर शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी देखील उपलब्ध आहेत.
आचार्य पदवी, संशोधन कार्य, आर-सॉफ्टवेअर, पायथॉन चे शिक्षण
विद्यापीठातील सांख्यिकीशास्त्र विभागामध्ये पदव्युत्तर एम.एस्सी. सांख्यिकीशास्त्र, आचार्य पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून, संशोधन कार्य, आर-सॉफ्टवेअर, पायथॉन इत्यादी संगणकीय कार्य विद्याथ्र्यांना शिकविले जातात.
विद्याथ्र्यांकरिता सोयीसुविधा उपलब्ध
संगणकशास्त्र विभागामध्ये विद्याथ्र्यांकरिता सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, दरवर्षी विभागाच्यावतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी मेळावे अशा विद्यार्थी विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
संगणकशास्त्र विभागाचे विद्यार्थी अऩेक आस्थापनांमध्ये कार्यरत
संगणकशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्याथ्र्यांना रोजगाराच्या मोठ¬ा संधी उपलब्ध असून, विभागाचे अनेक माजी विद्यार्थी भारत सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विविध आस्थापना, उपक्रम तसेच खाजगी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.
प्रवेशासाठी संपर्क
संगणकशास्त्र विभागाची एम.एस्सी. प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्याथ्र्यांनी प्रवेशाकरिता तसेच आवश्यक माहितीकरिता विभागप्रमुख डॉ. राजेश सिंह यांचेशी किंवा अध्यक्ष, केंद्रीय प्रवेश समिती, पदव्युत्तर बॉटनी विभाग मो. क्र. 8329464599 यावर संपर्क साधावा व आपले प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.



