Amaravti GraminAmravatiLatest News

राजुरा वासी वेळा वासी यांची घरकुल साठीची आरक्षित जागा हडपली -घरकुल जागेवरील अवैध अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी

अमरावती : राजुरा ग्रामस्थ व बेळावासीयांच्या विविध मागण्यांसाठी गिरीश चौधरी यांनी पुकारलेल्या ३ दिवशीय ( ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५) आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची सांगता नायब तहसीलदार राजीव दंडाळे यांच्या हस्ते करण्यात आली होती. यामध्ये गिरीश चौधरी यांनी अन्नत्याग आंदोलन व राजूरा गाव व बेळावासीय साखळी उपोषण बसले होते. यामध्ये राजूरा येथील बेळावासीयांच्या घरकुल जागेवर अवैध अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आले असल्याचे समजते.

या संदर्भात राजुरावासी यांनी प्रत्यक्षात भेटुन दिले अनिलजी भटकर ,जिल्हाधिकारी निवासी अमरावती व तहसीलदार विजय लोखंडे यांनीही निवेदन देण्यात आले होते. परंतू अजूनही यावर कुठलीही कार्यवाही झाली नसुन अतिक्रमण हटविण्यात आले नसुन राजुरा वासीयांना व बेळा वासीयांना घरकुलासाठी आरक्षित जागा ( निकिता हुंका पवार व त्यांची संस्था) हडपली असुन जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यात आले नाही ते तात्काळ काढण्याची मागणी करण्यात आली असुन दि.१५ जून २०२५ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

मागण्या पूर्ण न झाल्यास न्याय ९ आॉगस्ट ‘क्रांती दिन’ रोजी मोठे साखळी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जाणता युवा संघटक गिरीश चौधरी व ग्रामस्थांच्या व वेळा वासीयांच्या वतीने देण्यात आला आली यावेळी गिरीश चौधरी (संस्थापकजाणता युवा संघटना, बहुजनांचा बहुचर्चित आंदोलक, समाजसेवक) पद्माकर शेळके, अंगुरि पवार, संजीवनी वानखडे, टेकाडे बंधू व भगिनी, शारदा शेळके सर्व ग्रामपंचायत सदस्य, चंद्रशेखर पतंगराय, हरीश नांदेडकर, मयलेश चव्हाण, प्रविण मुंजाळे , योगेश मानकर, संगीता, चित्रा, मनोज, राहुल, ऋषी, वंदेश सर्व भोसले बंधू, सर्व पवार बंधू, चव्हाण बंधू, विठोरि, मयांक, यमदास , खोडके, अनिकेत, राजूरा गावकरी मंडळी व राजूरा बेळा जवळपास लोक 100 हजर होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button