AmravatiLatest News

राजकमल चौक व बापट चौक परिसरात प्लास्टिक जप्ती मोहीम; १५ हजार रुपये दंड व २ किलो प्लास्टिक जप्त

अमरावती : मा. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव यांच्या सूचनेनुसार दिनांक १५ जुलै २०२५ रोजी मध्य झोन क्र. २ अंतर्गत येणाऱ्या राजकमल चौक व बापट चौक परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहिम राबविण्यात आली.
सदर मोहिमेत एकूण २१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान आस्थापनांमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये कापडी/कागदी पिशव्यांचा वापर न करता ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधित किरकोळ विक्रेत्यांकडून अंदाजे २ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
यामध्ये तीन आस्थापनांवर प्रत्येकी ५०००/- रुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये ओझी लेडीज वेअर, टॉप सेल व अमृततत्त्व चहा यांचा समावेश असून एकूण १५,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सदर मोहिमेत प्लास्टिक पथकाचे नोडल अधिकारी विकी जेधे, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक विजय बुरे, श्री. कलोसे, श्री. पिवाल, रोहित हडाले, श्री. फुके तसेच हॉटेल वेस्ट स्वच्छता निरीक्षक प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिकचा वापर टाळावा व शासनाच्या सूचनांचे पालन करावे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button