AmravatiLatest News

डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल : रुग्णांसाठी विश्वासार्ह चिकित्सा केंद्र : १७ जुलै२०२५ रोजी दंतचिकित्सा विभागात वाकडे दात व इतर ऑर्थोडोंटिक सल्ला मिळणार मोफत

अमरावती : मार्डी रोडवर स्थित डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल हे रुग्णांसाठी एक विश्वासार्ह चिकित्सा केंद्र म्हणून अविरत कार्यरत आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक विभाग अत्याधुनिक सोयींनी उत्तम प्रकारे कार्यरत असून दंतरोग विभाग अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
गुरुवार , दि.१७ जुलै २०२५ रोजी येथे दंतचिकित्सा विभागात अत्यंत महाग असलेली ऑर्थोडोंटिक सुविधा रुग्णांना मोफत असून या संबंधी तज्ञ दंतचिकित्सकां द्वारे रुग्णाची तपासणी होणार आहे . या सुविधेचा लाभ वेडे – वाकडे दात, दातांमध्ये फट , दातांच्या चुकीच्या ठेवणी मुळे चेहऱ्याच्या सौन्दर्यावर परिणाम होत असलेल्या रुग्णांना घेता येणार आहे. गुरुवार, दि.१७ जुलै २०२५ रोजी अमरावती येथील ख्यातनाम दंतरोग चिकित्सक ऑर्थोडोंटिस्ट डॉ. राणा नंदकिशोर चिखले द्वारा गरजू रुग्णांना मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे. कुणाला पुढील उपचार घेण्याची गरज पडल्यास ते डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे दंतचिकित्सा विभागातअत्यल्प दरात करण्यात येणार आहे.
डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे रुग्णांना “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना” अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ सुद्धा दिला जातो.


दंतरोग विभागात अलीकडे जबड्याची जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली असून, अशा अनेक दंतसमस्यांवर येथे आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने उपचार करण्यात येतात.
वेडे-वाकडे दात, दातांमध्ये असलेल्या फटी, किंवा दातांच्या चुकीच्या ठेवणीमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो, आणि त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. अशा रुग्णांसाठी ऑर्थोडॉन्टिक (दात सरळ करणे) शस्त्रक्रिया विभागात कार्यरत असलेले डॉ. राणा नंदकिशोर चिखले (MDS, Orthodontics) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
दंतरोग विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. सिद्धांती न्याहतकर, डॉ. अश्विनी ढगे, डॉ. सोनल दायमा, डॉ. मुस्कान सोनी हे अनुभवी दंतचिकित्सक नियमित सेवा देत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा ऑर्थोडॉन्टिक (दात सरळ करणे) मोफत तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात येत आहे.


इंदिरा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे, सचिव मिस तन्वी गोडे व प्रख्यात शल्यचिकित्सक व सी.ई.ओ. डॉ. योगेशजी गोडे सर यांनी समाजातील गरजू रुग्णांसाठी सर्वोत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय बाळगले आहे, आणि हे ध्येय साकार होत आहे.
तरी गरजूंनी डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे दि.१७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होत असलेल्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीरज मुरके यांनी केले आहे.

प्रतिनिधी : नितेश किल्लेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button