AkolaDharmikLatest News

अकोल्यातील श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी!

अकोला: अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली. पहाटेपासूनच शिवभक्तांच्या रांगा लागल्या होत्या.

यावेळी शेकडो कावडयात्रींनी मोठ्या उत्साहात जल अर्पण करून भगवान महादेवाला अभिषिक्त केले. श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वामुळे मंदिर परिसराबाहेर मोठी यात्रा भरली होती. या यात्रेत किरकोळ विक्रेते आणि लघु व्यावसायिकांनी विविध घरगुती वस्तू, खेळणी आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. भाविकांसाठी साबुदाणा वडा, साबुदाणा उसळ, बटाटा चिप्स आणि गुळपट्टीसारखे पारंपरिक पदार्थ उपलब्ध होते, ज्यांना भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.

तगडा पोलीस बंदोबस्त

भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसेच श्वानपथकही दक्ष ठेवण्यात आले होते. यामुळे भाविकांना सुरक्षित आणि शांततेत दर्शन घेता आले.

अकोल्यातील श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील प्रत्येक सोमवारी अशीच गर्दी अपेक्षित असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button