AmravatiLatest NewsMaharashtra

विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : क्रीडा, सांस्कृतिक, आविष्कार, आव्हान, उत्कर्ष अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संबंधित अधिका-यांनी प्रमाणित केलेल्या विद्याथ्र्यांच्या उन्हाळी – 2025 विद्यापीठीय पर्यायी परीक्षांचे वेळापत्रक परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आले असून, 26 जुलै, 2025 पासून सदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्वसंबंधित विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
               जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, अमरावती जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची परीक्षा ही विद्याभारती महाविद्यालय (केंद्र क्र.126), अकोला जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (205), बुलडाणा जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची विज्ञान महाविद्यालय, मलकापूर (322), यवतमाळ जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांची अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ (401) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांची परीक्षा ही त्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील नमूद परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. विद्याथ्र्यांना देण्यात आलेले परीक्षा क्रमांक व प्रवेशपत्र पर्यायी परीक्षेकरिता कायम राहतील. तसेच वेळापत्रक व परीक्षा केंद्रनिहाय रोललिस्ट विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
              यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button