Latest NewsMaharashtra

दिल्ली भेटीचं रहस्य: एकनाथ शिंदे, अमित शाह आणि श्रीकांत शिंदेंची IT नोटीस

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा काल रंगली. विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री आणि शिंदे यांचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनीच श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं विधान केलं. पण त्यानंतर काही वेळातच त्यांनी घूमजाव केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारमधील सुत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे तीन टर्मचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं विधान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. संजय शिरसाट यांनादेखील प्राप्तिकर विभागाची नोटीस आलेली आहे. खुद्द शिरसाट यांनीच ही माहिती दिलेली आहे. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं विधान शिरसाट यांनी केल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं. पण सरकारमधील सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागानं कोणतीही नोटीस बजावलेली नाही.

प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या अर्जांच्या छाननीसाठी सीएएसएसचा (कॉम्प्युटर असिस्टेड स्क्रुटिनी सिलेक्शन) वापर करण्यात आलेला आहे. ‘सीएएसएसमधून होणारी अर्जांची छाननी पूर्णपणे कॉम्प्युटरवर आधारित असते. त्यात मानवी हस्तक्षेप नसतो. आधीच निश्चित करण्यात आलेले जोखीमांचे मापदंड लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत,’ अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे.mumbai

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना त्यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं सांगितलं. २०१९ ते २०२४ या कालावधीत झालेल्या संपत्तीच्या वाढीबद्दल प्राप्तिकर विभागानं स्पष्टीकरण मागितलं असल्याचं शिरसाट म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचं शिरसाट म्हणाले होते. पण त्यानंतर त्यांनी यावरुन यूटर्न घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री तडकाफडकी दिल्लीला गेले होते. काल ते राज्यात परतले. शिंदेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शिरसाट यांना आलेली नोटीस, हिंदी भाषा सक्तीवरुन राज्यात पेटलेलं रान, त्यामुळे शिवसेनेची झालेली गोची, ठाकरे बंधूंची संभाव्य युती या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शहांची भेट घेतली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button