AmravatiLatest NewsMaharashtra

विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र व पाणलोट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनपदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरूअंटार्टिका येथे अभ्यासदौरा

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात चालू शैक्षणिक वर्षासाठी एम.एस्सी. भूगर्भशास्त्र व पाणलोट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना उद्योग, प्रशासन आणि पर्यावरणीय संस्थांमध्ये वाढती मागणी असल्याने विद्याथ्र्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. विद्यापीठाचा भूगर्भशास्त्र विभाग मागील 30 वर्षांपासून संशोधन, प्रायोगिक शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. विभागाचा दृष्टीकोन “शाश्वत विकासासाठी सर्वांसाठी भूविज्ञान” असा असून, “प्रादेशिक व जागतिक विकासासाठी भूवैज्ञानिक ज्ञान तांत्रिक नवकल्पनांच्या साहाय्याने देणे” हे त्याचे उद्दिष्ट आहे.
एम.एस्सी. भूगर्भशास्त्र – व्यावसायिक संधींना चालना
हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून, यामध्ये खनिजशास्त्र, शैलशास्त्र, भूजलशास्त्र, पर्यावरण भूविज्ञान, रिमोटसेन्सिंग व जी.आय.एस. यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमानंतर खाण उद्योग, तेल व नैसर्गिक वायू कंपन्या, पर्यावरण सल्लागार संस्था, भूजल व जलसंपत्ती विकास संस्था यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
भूगर्भशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अशोककुमार श्रीवास्तव यांनी अंटार्टिका या निर्मनुष्य व बर्फाळ प्रदेशात जावून संशोधन कार्य केले आहे. याशिवा मेळघाटमध्ये जीवाश्म शोधण्याचे कार्य भूगर्भशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांनी केले असून विदेशी विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन कार्याला चालना दिली आहे.
एम.एस्सी. भूगर्भशास्त्र या अभ्यासक्रमासाठी पात्रता:
सदर अभ्यासक्रमासाठी बी.एस.सी. भूगर्भशास्त्रविषयासह उत्तीर्ण, पाणलोट तंत्रज्ञान व व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीका – शाश्वत पाणीसंपत्ती विकासाचे व्यावसायिक शिक्षण या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमात पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण, मातीची धूप रोखणे, नैसर्गिक वनस्पतींचे पुनरुत्पादन, बहुपीक प्रणाली आणि कृषी-आधारित उपजीविकेचे तंत्र शिकवले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे होणा-या जलटंचाईच्या पार्·ाभूमीवर या अभ्यासक्रमाची गरज आणि महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पाणलोट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता:
एम.एस्सी. (कोणताही विषय), एम.एस्सी. टेक., बी.ई./बी.टेक. (सिव्हिल, रिमोटसेन्सिंग, जलसंपत्ती), बी.एस्सी. (कृषी), एम.ए. (भूगोल) अशा कोणत्याही पात्रतेच्या विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादी किंवा ‘प्रथम या, प्रथम मिळवा’ या तत्वावर आधारित आहे. या कोर्सची प्रवेश क्षमता फक्त 20 जागांपुरती मर्यादित आहे.
सरकारी आणि खाजगी क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी
या अभ्यासक्रमानंतर विद्याथ्र्यांना केंद्रीय भूजल मंडळ, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था, महाराष्ट्र रिमोटसेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, अटल भूजल योजना, जल जीवन मिशन यांसारख्या शासकीय योजनांसह एन.जी.ओ. मध्ये रोजगाराच्या मोठ¬ा संधी आहेत.
या वर्षी विभागाचे 13 विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित परीक्षेत सहायक भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था पदासाठी मुलाखतीस पात्र ठरले आहेत. सोबतच विभागामध्ये 10 विद्यार्थी पीएच.डी. करित असून त्यामधील दोन विद्याथ्र्यांना भारत सरकारकडून फेलोशिप देण्यात येत आहे. तसेच दर वर्षी विभागातील अनेक विद्यार्थी नेट, सेट यांसारख्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत आहेत.
प्रवेशासाठी संपर्क
विद्याथ्र्यांनी विद्यापीठाच्या https://uniconnect.app.link/ZKBEnQ3kFUb या अॅप वर जाऊन आपला प्रवेश अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी अध्यक्ष, केंद्रीय प्रवेश समिती किंवा विभाग प्रमुख डॉ. वाय. के. मावळे यांच्याशी मो. क्र. 8788573465 यावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीे करण्यात येत आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button