Latest NewsMaharashtra

“निकृष्ट डाळीवरून आमदाराची मारहाण! संजय गायकवाड वादात, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल”

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या डाळीवरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी या घटनेची निंदा करत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. गायकवाड यांचा मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, निकृष्ठ दर्जाची डाळ दिल्याने त्यांनी मारहाण केली. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जर डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण? तुमचं सरकारच आहे. याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये गोर-गरिबांच्या घरामध्ये आदिवासी पाड्यावर मिळते. मोदी जे केही फुकट धान्य वाटतायेत त्याची क्वालिटी पाहा. फक्त आमदारांना ५० कोटी मिळाले आहेत, ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत. कँटीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहेच, पण टॉवलवर मारहाण करायची का? आमदाराने मारहाण करायची आणि आपली बाजू मांडायची की मला डाळ, भात मिळाली नाही. मला असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. मारहाण करण्याआधी सभागृहात हा विषय मांडू शकता. मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही गरीब कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि त्यांचे आमदार राज्यीतील दुर्बल आहेत. ते आरेला कारे करू शकत नाही त्यांनाच मारत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ पाहिला असेल ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे. सबागगृहाबाहेर मारहाण झाल्यामुळे त्याला सबागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तो मुका माणून त्याला बोलण्याचा अधिकार नाही. तो गरीब आहे, तुमचे सरकारचे आमदार गरिबाला अशा प्रकारे लाथा बुक्यांनी मारतायेत आणि सर्वत्र मारतायेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button