Amaravti GraminLatest News

“स्मार्ट मीटर जबरदस्ती थांबवा – बाळासाहेब वानखडे, माधव अवघड, संदीप पाचघरे यांचा इशारा”

अचलपूर : परतवाडा व चांदूरबाजार तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे स्मार्ट टीओडी मीटर जबरदस्तीने बसवले जात असल्याच्या विरोधात आज संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला. ग्राहकांच्या संमतीशिवाय व कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी घराघरात स्मार्ट मीटर बसवत असल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.

विद्युत ग्राहकांना अवाजवी वीजबिलं – तीन ते चार हजार रुपये येत असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे शेतकरी, शेतमजूर व रोजंदारीवर काम करणारे कुटुंब हवालदिल झाले आहेत. त्यामुळे “स्मार्ट टीओडी मीटर बसवण्याचे काम तात्काळ थांबवले जावे” अशी जोरदार मागणी महाराष्ट्र धनगर विकास परिषदेचे उपाध्यक्ष माधव अवघड, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाचघरे, व माजी नगरसेवक बाळासाहेब वानखडे यांनी केली आहे.

  • ठळक मुद्दे –
    ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मीटर बसवले जात आहेत.
  • रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक ताण.
  • आत्महत्येपर्यंत परिस्थिती जाण्याची भीती.
  • स्मार्ट मीटरविरोधात जनआंदोलनाचा इशारा.

निवेदन सादर करताना उपस्थित…
महावितरणच्या अचलपूर येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये:

माजी नगरसेवक बाळासाहेब वानखडे, माधवदादा अवघड, संदीप पाचघरे, सौ. अक्षरा लहाने, मनोज जामनेकर, विलास रहाटे, योगेश थोरात, अमित मुंदळकर, अंकुश मोहोळ, रुपेश लहाने, दत्तराज विचे, अभिनय बोरवार, गजानन नांदणे, गणेश जावरकर, सागर भांनगे, तसेच सौ. मायाताई ठाकरे, उर्मिला पाजनकर, पुष्पा ड्युटे, प्रीती घोटेकर यांचा समावेश होता.

संदीप पाचघरे यांचा इशारा –
“जर स्मार्ट टीओडी मीटर जबरदस्तीने बसवले गेले, तर अनेक गरीब कुटुंबांवर आत्महत्येची वेळ येईल. प्रशासनाने वेळेत जागे व्हावे, अन्यथा आम्ही मोठ्या स्वरूपात जनआंदोलन करू.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button